सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सार्वांगी सुन्दर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पूर्ति जयदेव जयदेव ॥
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।
चंदनाची उटि कुंकुमकेशरा ॥
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पूर्ति जयदेव जयदेव ॥
लम्बोदर पीताम्बर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ॥ ३ ॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पूर्ति जयदेव जयदेव ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी ।
सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥
त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु ना बोलवे काही ॥
साही विवाद करिता पडलो प्रवाही ।
ते तू भक्ता लागी पावसी लवलाही ॥ २ ॥
जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी ।
सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी ।
सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥
देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ३ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ ४ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ॥
तुळसींमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥ २ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ॥
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां ॥
राई रखुमाई राणीया सकळा ।
ओंवाळिती राजा विठोबा सांवळा ॥ ३ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ॥
ओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥
दिंड्या एताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णांवा किती ॥ ४ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नानें जें करिती ॥
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती ॥ ५ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ॥
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।
सुरवर, नर, निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।।
दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ॥
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥
जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणा ॥
नेति नेति शब्दें न ये अनुमाना ।
सुरवरमुनिजनयोगिसमाधि न ये ध्याना ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥
सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराहि परतलि तेथें कैचा हा हेत ।
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ३ ॥
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥
'दत्त दत्त' ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ॥
मी-तुंपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ॥
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
बुध्दात्मना व प्रक्रुतिस्वभावअत् ॥
करोमि यद्त्सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥
अचयुतं केशवं रामनारायणं
क्रुष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥ ४ ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे क्रुष्ण हरे क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे ॥ ५ ॥
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको
दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ॥
हाथ लिए गुड-लड्डू साईं सुरवरको
महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको ॥ १ ॥
जय जय श्री गणराज विध्यासुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी
विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी ॥
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी
गंड-स्थल मदमस्तक झूले शाशिहारी ॥ २ ॥
जय जय श्री गणराज विध्यासुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
भावभगत से कोई शरणागत आवे
संतति सम्पति सभी भरपूर पावे ॥
ऐसे तुम महाराज मोको अति भावे
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ ३ ॥
जय जय श्री गणराज विध्यासुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥ १ ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॥ २ ॥
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं
माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष
आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ॥ ३ ॥
तदप्येषः श्लोको ऽभिगीतो
मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ॥ ४ ॥